देशातील नवा कापूस हंगाम आता सुरु झालाय. अनेक बाजारांमध्ये कापूस दाखल होतोय. पुढील महिन्यात कापसाची आवक वाढेल. पण यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज उद्योग व्यक्त करत असल्यानं बाजार काहीसा दबावात येतोय. त्यातच आता चीनमधून सूत आयात वाढतेय. याचाही दबाव कापूस बाजारावर येण्याची शक्यता व्यक्त होतेय. पण भारताचं सूत एरव्ही स्वस्त असतं, मग यंदा चीनच्या सुताची आयात का वाढतेय? या सूत आयातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.